मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

एनक्यूएसमध्ये जिल्ह्यातील ठाणा,चोपा व दासगाव पीएचसीचा समावेश

गोंदिया,दि.29 :  ग्रामीण भागातील जनतेला चांगली व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) देण्याचे जाहिर केले.त्यामध्ये नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यक्षेत्रातंर्गत येत असलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे ही तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदिया जिल्ह्यातील आहेत.त्यामध्ये आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणा प्रथम,गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा आणि गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा  समावेश झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांनी सांगितले.

तसेच या आरोग्य केंद्रासह इतर सर्व आरोग्य केंद्रातील कामकाजावर आणि रुग्णालयातील गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्ह्यातील 42 ही प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्दा लावण्यास सुरवात करण्यात आली.सोबतच कार्यालयीन कर्मचार्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक लावण्याचे कामही अंतिम टप्यात आले आहे.ज्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) प्रमाणपत्रासाठी करण्यात आली.तेथील अधिकारी,कर्मचार्यांनी केलेले कार्य इतर केंद्रासाठी मार्गदर्शन करणारे ठरल्याचे डाॅ.निमगडे यांचे म्हणने आहे.निवड झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 3 लाख रुपये आरोग्य संस्था बळकटीकरणासाठी तीन वर्ष केंद्राच्या निधीतून मिळणार आहेत.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) अभियानात सहभागी झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी तज्ञ चमूने केले असून त्या चमूने निरीक्षण करून अटी व शर्तीमध्ये वास्तविक उतरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड केली आहे.या निवड झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिकाधिक चांगली सेवा अजून देता यावे यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेचा दर्जा उत्तम आहे किंवा नाही हे तपासून तसेच सोयीसुविंधाचा अहवाल आरोग्य उपसंचालकामार्फत शासनाला पाठविण्याचे निर्देश होते.त्यामध्ये आरोग्य केंद्रात प्रसूती केली जाते.परंतु ज्या आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण सर्वाधिक असेल, आरोग्य केंद्राची आंतर व बाह्य स्वच्छता चांगली असेल, त्या आरोग्य केंद्रातील रेकार्ड अद्यावत असेल, जैवीक कचऱ्याची विल्हेवाटीसाठी उपाययोजना केल्या असतील अशा १०० अटीमध्ये खर्या उतरणाऱ्या आरोग्य केंद्राची एनक्यूएसच्या चमूने तपासणी केली होती.  विदर्भातून केवळ तीन आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आली. ते तिन्ही आरोग्य केंद्र गोंदिया जिल्ह्यातील आहेत.

Share