डॉटस् उपचार पध्दती क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम- रमेश अंबुले

0
19

गोंदिया,दि.30 : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जातात. या क्षयरुग्णांना बरे होण्यासाठी डॉटस् उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून २४ मार्च रोजी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.चांदेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस.भुमकर यांची उपस्थिती होती.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबत जनजागृती करणारे पॉम्पलेटस् वाटप करण्यात आले यावेळी क्षयरोग जनजागृतीच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथील सर्व कर्मचारी, तसेच दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.सचिन चौधरी, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे कर्मचारी, नर्सिंग शाळेचे प्रशिक्षणार्थी, राधाबाई नर्सिंग शाळेचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सभागृह, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, सी.बी.भुजाडे, प्रज्ञा कांबळे, धनेंद्र कटरे, हरिष चिंधालोरे, अमित मंडल, डी.सी.डोंगरवार, पंकज लुथडे, श्री.गजभिये, श्री.अग्रवाल, विलास राठोड, एच.एस.उईके, ज्योति आगाशे, प्रियंका पटले, सुभाष कापडणे, श्री.खरेद, राजु मेश्राम, रिजवाना शेख, संजय रेवतकर, रामचंद्र लिल्हारे, मंजुरी मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.बी.एस.भुमकर यांनी मानले.