उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
16

सांगली,दि.30ः- शाळेतील व सामाजिक योगदानाबद्दल  दुष्काळभागातील कर्नाटक सिमाभागाजवळील माळरानातील जि.प.प्रा.मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी ) आसंगीतुर्क केंद्रातील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य सांगलीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार सुरेश खाडे,जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख व जेष्ट अभिनेते विलास रकटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत,बाळासाहेब होनमोरे,जि.प.सदस्य स्नेहलता जाधव,प्राचार्य शिंगे गौतम,दयानंद लांडगे,डॉ बाळासाहेब व्हनखंडे,प्रमोद काकडे,गणेश मडावी,मच्छीद् ऐनापूरे ,लखन होनमोरे,संतोष काटे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.दिलीप मारोती वाघमारे हे जि.प.शाळा बाबरवस्ती (पांडोझरी) सहशिक्षक आहेत त्याच्या आज पर्यत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये बहूमोल योगदान आहे.आजपर्यंत शैक्षणिक मासिक व वृत्तमान पञात लेख व कविता लेखन करतात व त्यांनी साविञीबाई फुले विशेषांक2017 स्वतः संपादीत करुन विशेषांक प्रकाशीत केले आहेत.अनेक शाळेत ज्ञानरचनावाद,बोलक्या भिंती व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे .असे अनेक उपक्रम शाळेत राबवितात. त्याच्या शाळेतील वृक्षसंगोपन हा उपक्रम सलग दोन वर्ष सुट्टीत गावाकडे न जाता दुष्काळीभागात राबविले.त्यांचे काम प्रेरणादायी आहे म्हणून हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.