आमदारांच्या हस्ते उत्कृष्ठ पशुपालकांचा सत्कार

0
11

गोरेगाव,दि.30ः- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन विभागाच्यावतीने येथील पंचायत  समितीच्या पटागंणात कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटन तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहागंडाले यांच्या हस्ते कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे,गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप चौधरी,बबलू बिसेन,कृषी बाजार समिती तिरोडा सभापतीचे डाॅ.चिंतामण रहागंडाले,जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई वरखडे,गोरेगाव नगर पंचायत सदस्य हिराभाऊ रहांगडाले,सुरेश रहांगडाले,रेवेंद्र बिसेन,कृषी व पशुसवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील उत्कृष्ठ पशुपालकांचा सत्कार करण्यात आला.