ओबीसी महिला सेवा संघाच्यावतीन आरोग्य शिबिराचे आयोजन

0
13

भंडारा,दि.31ः- भंडारा जिल्हा ओबीसी महिला संघाच्या गुंजेपार महिला ओबीसी संघ शाखा आणि गट ग्रामपंचायत जाख तसेच विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून (दि.29) आरोग्य शिबिर आयोजित करुन महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.संजय वाने,डाॅ. शैलेश कुकडे उपस्थित होते.यावेली पाहुणे म्हणून माजी सरपंच विनोद जगनाडे,सामाजिक कार्यकर्ता कानेकर,कविता डहाके,भारती मने,अंतकला चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्ष ओबीसी सेवा संघाच्या अध्यक्षा मंजुषा बुरडे होत्या. आरोग्य शिबिराची सुरवात क्रांतीज्योती सावीञीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.आरोग्य शिबीराचे मुख्य मार्गदर्शक डाॅ.संजय वाने यांनी सावित्रीबाई फुल्याची प्रेरणा घेऊन समाजात कार्य करावे, सर्व महिलांनी एकञ येऊन हक्क व अधिकाराविषयी जागृत होऊन संघर्ष करावा असे आवाहन केले. आरोग्य शिबीरामधे 150 महिलांनी भाग घेतला व सर्व रुग्णाची तपासणी करण्यात आली.संचालन व प्रास्ताविक उपाध्यक्ष वहिद शेख यांनी केले, आभार चव्हाण यांनी मानले.आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक भारती मने, कविता डहाके, रोहीनी सार्वे, मारवडे ताई व सर्व ओबीसी महिला पदाधिकारी शाखा गुंजेपार व विविध महिला बचत गट, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.