नवीन पेंशन योजना बेभरवशाची व अन्यायकारक-श्याम राठोड

0
10

सांगली,दि.31ः-सरकारने १नोव्हेंबर२००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्यांना परिभाषित अंशदान पेंशन योजना अंमलात आणली आहे.या योजनेचे स्वरूप एकूण पगाराच्या १०% रक्कम कर्मचाऱ्यांची कपात करायची आणि तेवढीच रक्कम शासन हिस्सा म्हणून त्यात जमा करायचे या एकूण रक्कमेवर शासकीय दराने व्याज द्यायचे.असे या योजनेच
स्वरूप आहे.आणि याचा हिशोब दरवर्षी द्यावयाचा आहे;परंतु गेल्या १३ वर्षात शासन केवळ कर्मचाऱ्यांची १०% रक्कम कपात करून घेत आहे.त्यात शासन हिस्सा दिला नाही. शिवाय रक्कमेचा वेळोवेळी हिशोब दिला जात नसल्याने ही योजना अन्यायकारक असल्याची टिका जत तालुका अध्यक्ष श्याम राठोड यांनी केली आहे.

एखादा कर्मचारी सेवा बजावत असताना मयत झाल्यास त्याच्या कुटुंबाला जुन्या पेंशन योजनेत पाठीमागे असणाऱ्या कुटुंबाला पेंशन दिली जात होती; नवीन पेंशन योजनेत असणारे महाराष्ट्रात १३७५ कर्मचारी मयत झाले आहेत.त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आजपर्यंत कसलीही मदत केली नाही.या मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत.१३ जुलै २०१६ रोजी सात सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आणि १० लाख रुपये मदत मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी.अशी शिफारस केली गेली; परंतु आजपर्यंत एकही असा शासन आदेश काढला नाही;की मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली नाही.ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील ७८ आमदारांनी जुनी पेंशन योजना लागू करावी ह्या एकमेव मागणीसाठी सहमतीपत्रे मुख्यमंत्री याना दिली आहेत. जुनी पेन्शन लागू करावी यासाठी मुख्यमंञ्याना पञ देणारे विलासराव जगताप साहेब हे महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत. परंतु सरकार सर्रास याकडे दुर्लक्ष करते आहे.शासन कर्मचाऱ्यांची १०% रक्कम कापून घेत आणि ९०% च पगार देतो.त्याला पेंशन सुद्धा दिली जात नाही. जुन्या पेंशन योजनेत कसलीही पगार कपात केली जात नाही.अंशदान पेंशन योजनेत सरकार कर्मचाऱ्यास किती पेंशन देणार ?पेंशन देणार की नाही देणार? याचा कसलाही भरोसा नाही. ही योजना पूर्णपणे फसलेली आहे.व बिनभरोषाची आहे.म्हणून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचार्यांना १९८२ ची नागरी जुनी पेंशन योजना लागू करावी.यासाठी येत्या चार एप्रिला गुड्डापूर येथे जुनी पेन्शन मिळविण्यासाठी 1नोव्हबर 2005नंतर सेवेत आलेले सर्व कर्मचारी भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे . तरी सर्व विभागातील डी.सी.पी.एस,व एन.पी एस धारक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन तालूका अध्यक्ष श्याम राठोड यांनी केलेआहे.