नॅचरल ग्रोवर साखर कारखान्याला सील

0
19

लाखांदूर,दि.31ः-नगरपंचायतीचा मालमत्ता कर न भरल्याने येथील नॅचरल ग्रोवर साखर कारखान्याला नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सील ठोकले.
कारखाना प्रशासनाकडे २ लाख ४१ हजार रूपयांचा थकित मालमत्ता कर असल्याने कर्मचार्‍यांसह जाऊन मुख्याधिकारी यांनी सील लावले. त्यांच्या या कारवाईमुळे त्यांच्या धाडसी कारवाईचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच मुख्याधिकार्‍यांनी पवनी येथे कर्तव्यावर असताना पोलिस ठाण्याला सुध्दा सिल लावली होती.
सन २0११ मध्ये नॅचरल ग्रोवर साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत सन २0१२ मध्ये थाटामाटात या साखर कारखान्याचे उद््घाटन झाले.
या कारखान्यावर नगरपंचातीचा २ लाख ४८ हजार रूपयाचा मालमत्ता कर होता. यापूर्वी कारखाना प्रशासनाला नगरपंचायतीच्यावतीने कर मागणीची नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु, कारखाना प्रशासनाने कर न भरल्याने बुधवारी लाखांदूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी कर्मचारी लिपीक विनय करंडेकर, विश्‍वास बोरकर, संतोष राऊत, कापगते, राऊत आदींनी स्थळी पोहचून कारखान्याला सिल लावले.