धापेवाडावासीयांनी नदीवर बांध तयार करून केली पाणीटंचाईवर मात

0
24

गोंदिया,दि.31ः-तालुक्यातील धापेवाडा गावाजवळून वाहणार्‍या वैनगंगा नदीवर बंधारा तयार करून येथील गावकर्‍यांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. सरपंच डॉ. रिना रोकडे यांनी जागतिक जलदिवसाचे औचित्य साधून गावातील शेकडो नागरिकांसह जलपूजन करून बंधार्‍याच्या कामाला सुरुवात केली.जलपूजना प्रसंगी उपसरपंच धनराज दोनोडे, जितेंद्र मेश्राम, सर्व सदस्य, तांत्रिक अभियंता डी. झेड, लिल्हारे, रोजगार सेवक संतोष उके, डॉ.प्रदीप रोकडे , शालू पटले, कौतिका येरणे, जितेंद्र मेर्शाम, पवन बनोटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशय आणि तलावांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. भूजल पातळी सुध्दा २ मीटरने खालावली असून गावकर्‍यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आपल्या परिसरातील संभाव्य पाणी टंचाईची स्थिती ओळखून त्यावर मात करण्यासाठी धापेवाडाच्या सरपंच रोकडे यांनी पुढाकार घेतला. तसेच जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गावकर्‍यांना पाण्याचे महत्व पटवून दिले.धापेवाडा गावाजवळून वाहणार्‍या वैनगंगा नदीच्या पात्रात सिंमेटच्या बॅगमध्ये रेती भरून गावकर्‍यांच्या र्शमदानातून बंधारा तयार केला. त्याच्या या कार्यालयाला गावकर्‍यांनी सुध्दा सहकार्य केले. यानंतर मनरेगातगरत तीन दिवस या ठिकाणी र्शमदान करण्यात आले. या बंधार्‍यामुळे धापेवाडा येथील गावकड्ढयांना पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे.