मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

‘एनएमसी’ विरोधात ‘मार्ड’चे आंदोलन

नागपूर,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २ एप्रिल रोजी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आंदोलन करून लक्ष वेधणार आहे. याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पाठिंबा दिला आहे.
‘सेंट्रल मार्ड’ने २५ मार्च रोजी दिल्लीत ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायतीचे आयोजन केले होते. या बैठकीत संप पुकारण्यासंदर्भात सर्व डॉक्टरांचे एकमत झाले होते. या महापंचायतीला देशभरातील २५ हजार डॉक्टर, कनिष्ठ डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही उपस्थित होते. ‘एनएमसी’ विधेयक गरिबांच्या विरोधात आहे. या विधेयकातील काही मुद्यांमुळे वैद्यकीय व्यवसायात भ्रष्टाचार वाढेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील वैद्यकीय व्यवसायाचे नुकसान होत आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील काही मुद्दे डॉक्टरांच्या विरोधात आहेत. संसदीय समितीने दिलेला रिपोर्ट मान्य करायचा का नाही, याचा अधिकार सरकारकडे आहे. त्यामुळे २ एप्रिलपासून सर्व डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता होती. परंतु २७ मार्चला हे विधेयक पुन्हा संसदेत चर्चेसाठी येऊन काही त्रुटींवर सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे बोलले जाते. आता संपाऐवजी आंदोलन करण्याचे ठरले असून नागपुरातील ‘मार्ड’ संघटना सोमवारी दोन तास विविध पद्धतीने आंदोलन करणार आहे. ‘आयएमए’ नागपूर शाखेने याला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांनी दिली.

Share