मुख्य बातम्या:

सिंचन विभागाचा शाखा अभियंता अपघातात गंभीर जखमी

कुरखेडा,दि.31: कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार झाडाला आदळल्याने गाडीचालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महेश कारेंगुलवार असे जखमीचे नाव असून, ते कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात शाखा अभियंता आहेत.सध्या मार्च अखेर असल्याने शाखा अभियंता श्री.कारेंगुलवार हे कोरची परिसरात कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते.  कोरचीवरून परत येत असताना डोंगरगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या तीव्र प्रकाश झोतामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार झाडावर आदळल्याने अपघात झाल्याचे समजते.कारेंगुलवार यांच्या डोक्याला दुखापत असून उजव्या हाताचे हाड मोडले आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच राजकीय पुढारी, कार्यकर्ते व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली.

Share