मुख्य बातम्या:

बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – राजधानीतील 26, अलीपूर रोड, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तयार झाले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. बाबासाहेबांचे शेवटचे दिवस आणि महापरिनिर्वाण हे दिल्लीतील याच ठिकाणी झाले होते. येथे आता पुस्तकासारखे दिसणारे भव्य म्यूजियम तयार करण्यात आले आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजनल आवाज 3डी मध्ये अनुभवता येणार आहे. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या क्लाससाठी बाबासाहेब जात आहेत, याच्या 3डी मुव्हमेंट पाहाता येणार आहेत. बाबासाहेबांचे हे राष्ट्रीय स्मारक बौद्ध शैलीत बांधण्यात आले आहे.

मुख्य प्रवेशद्वारातून स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 12 फुटांचा भव्य पुतळा दिसेल. दुसरीकडे, बोधीवृक्षाखाली बाबासाहेबांचा आणखी एक पुतळा असेल.स्मारकामधील एका भिंतीवर बाबासाहेबांचे विचार – ‘मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे!’ इंग्रजीमध्ये उद्धृत केलेले आहेत. इतर भिंतीवर संविधान सभेतील संपूर्ण बैठका, पंडित नेहरुंच्या पहिली कॅबिनेट, ड्राफ्टिंग कमिटी आणि घटना मसुद्यावर बाबासाहेबांची स्वाक्षरी पाहाता येईल.स्मारक भेटीचे तिकीट दर अद्याप निश्चित झाले नाहीत. मात्र एका व्यक्तीला 90 मिनिटानंतरच स्मारकातून बाहेर पडता येईल. स्मारकात विविध ठिकाणी टीव्ही स्क्रिनवर बाबासाहेबांविषयीची विविध माहिती दिली जाईल.  मोबाइल शेपमध्ये स्मारकाच्या माहितीविषयीचा इन्फर्मेशन पाँइट तयार करण्यात आला आहे.

Share