भाजयुमोचा संकल्प मेळावा आज गोरेगावात

0
7
चारही विधानसभा क्षेत्रातून निघणार बाईक रॅली
गोंदिया दि.१: भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि.१) जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून बाईक रॅलीचे आयोजन करून गोरेगाव येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव येथून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात बाईक रॅली निघणार आहे. देवरी येथून आमदार संजय पुराम यांच्या, तिरोडा येथून आमदार विजय रहांगडाले आणि गोंदिया येथून माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात बाईक रॅली निघणार आहे. दरम्यान गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या रॅलीचे समापन होणार असून संकल्प मेळाव्यात उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रविण दटके, दयाशंकर तिवारी, मॅनेजमेंट गुरू डॉ. सुमंत टेकाडे,  विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात आठही तालुकाध्यक्ष परिश्रम घेत असून या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा भाजयुमोतर्फे करण्यात आले आहे.