दोन चकमकीत 8 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

0
15
फाईलफोटो

श्रीनगर(वृत्तसंस्था)दि.1 – जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दोन ठिकाणी झालेल्या एन्काऊंटरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अनंतनाग येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक, तर दुसरीकडे शोपिंया येथे 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. शोपिंया येथे अजूनही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असून गोळीबार सुरु आहे. अनंतनागमधील पेठ दायलगाम येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांनी फोर्सवर फायरिंग केली, प्रत्युत्तरादाखल केलेल्या फायरिंगमध्ये एक दहशतवादी मारला गेला.तत्पूर्वी अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळताच त्यांनी आजूबाजूच्या परिसराला घेराव घातला. सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीमही राबवली. त्यानंतर सर्व बाजूनं घेरलं गेल्याचं लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफ जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. तो ताब्यात घेण्यात आला आहे.