समाजाप्रती प्रामाणिक रहाणे हे प्रत्येकांचे आद्य कर्तव्य : ना. बडोले

0
10
ना. बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना साळी,चोळीचे वाटप
गोंदिया,दि.01 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व या देशातील नागरिकांसाठी जे योगदान दिले ते महत्वाचे ठरले आहे. त्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचा आपला मानस असून महाराष्ट्रात स्मृती शेष जागेचा विकास तसेच समाजाचे प्रत्येक शोषित, पिडीत, व्यक्तिच्या आपल्या विभागाद्वारे समता, बुधत्व व न्याय या तत्वांना अनुसरून सर्व नागरिकांना समान न्याय देण्याचे कार्य आपण करीत आहोत, असे उद्गार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्ह्याद्वारे आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी ना. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
स्थानिक मामा चौक सिव्हिल लाईन गोंदिया येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या जन्मदिनानिमित्त सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. ना. बडोले पुढे म्हणाले, समता, बंधुत्व व न्याय या मध्येच समाजाचे प्रत्येक घटकांनी आपला योगदान देणे महत्वाचा आहे. आज समाजातील काही व्यक्ती आपल्या मिळकतीचा काही हिस्सा व्यसनामध्ये खर्च करीत आहेत.मात्र व्यसनापासून दुर रहाण्याचे काम प्रत्येक व्यक्तीने अंगकारणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले हे होत तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजणकर, भाजपा अनुसूचित जाती मोच्र्याचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, नगरसेविका भावना कदम, मेहताबभाई खान, अनुसुचित जाती महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिलाताई चौहान, माजी सभापती कविता रंगारी, सुनिल केलनका, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित बुद्धे, अल्पसंख्याक जिल्हा संघटन मंत्री अहमद मनियार, नगरसेवक अफसाना पठान आदी मान्यवर उप्िस्थत होते.
यावेळी रतन वासनिक हे मार्गदर्शन करतांना म्हणाले , आतापर्यंत आंबेडकरी समाजामध्ये अनेक नेत्यांनी वेंâद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपद भूषविले आहे. परंतु ५५ वर्षात पहिल्यांदाच सामाजिक न्यायमंत्री म्हणून लाभलेले राजकुमार बडोले यांनी आंबाडेकर समाजाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खर्या अर्थाने सन्मान दिला. समता, बंधुत्व व न्याय हे तत्व राजकुमार बडोले यांनी आपल्या जीवनात अंगिकारले आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच समाजासाठी व इतर समाजबांधवांसाठी वाखान्याजोगे आहे, असे मनोगत वासनिक यांनी व्यक्त केले. ५६ व्या वाढदिव्यानिमित्त ५६ किलो बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले तसेच गरजू महिलांना साळी-चोळीचे वाटप राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्ध भीम गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जाती मोच्र्याचे महासचिव अजित मेश्राम, अक्षय वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष श्याम चौरे, वसंता बहुजन, मुजिब पठान, सुधीर जांभुळकर, चंदू मेश्राम, जयेश परशुरामकर, राहुल कनोजिया, प्रदीप भरणे, रुद्रेश बेंदरे, नैनित भालाधरे, अफजल पठान, लोकेश नागपुरे, युवा प्रेâन्ड्गु्रप व अनुसूचित जाती मोच्र्याच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.