पेट्रोल, डिझेल दराने गाठला 4 वर्षातील उच्चांक

0
20

मुंबई,दि.01- राज्यात पेट्रोलच्या दराचा भडका उडाला असून औरगांबादमध्ये दर 82.56 रुपयांचा पोहचला आहे तर डिझेलप्रती लीटर 69.75 रुपयांवर गेले आहे. बुलडाणा येथे पेट्रोलचा दर 82.60 रुपये आहे. तर डिझेल प्रती लीटर 68.35 रुपयांवर पोहोचले आहे.नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. मुंबईतही पेट्रोलचा दर 81 रुपये व डिझेलचा दर 68 रुपये आहे. जळगाव येथे पेट्रोल 82.48 रुपये तर डिझेल 68.61 रुपयांवर पोहचले आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने आता विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची