मुंढेसारख्या प्रामाणिक अधिकार्याची गोंदियाला गरज-आ.फुके 

0
22
गोंदिया,दि.01- जिल्ह्यासह गोंदिया शहराच्या विकासासाठी सक्षम अशा अधिकाNयाची गरज असून येत्या दोन महिन्याच्या काळात गोंदिया जिल्ह्यात तुकाराम मुंढेसारखे तडफदार अधिकारी आणणार असल्याची माहिती आमदार परिणय पुâके यांनी गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सोबतच शहराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयाचा निधी लवकरच शासनाकडून उपलब्ध होणार आहे. त्या निधीची कामे व्यवस्थित होण्यासाठी ठोस निर्णय घेणारा सक्षम अधिकारी हवा या दृष्टिने आमच्या सरकारने लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले.
पूढे बोलताना ते म्हणाले, गोंदिया शहरातील गौशाळेकरीता मंजूर करवून दिलेले १ कोटी रूपये आपल्या प्रयत्नाने झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, स्थानिक आमदार नेहमीप्रमाणे या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे याचा एकदा सोक्षमोक्ष लावत समोरच्यांनी हा निधी आ.परिणय पुâके यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला नसल्याचे जाहीररित्या सांगावे. याबाबत अधिकची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री व त्यांच्या सचिवाशी बोलून खात्री करून घ्यावी असा टोला ही त्यांनी स्थानिक आमदाराना लगावला. गोंदिया शहराच्या रस्ते विकासासाठी १० कोटी मंजूर झालेले आहेत. सोबतच  २० कोटी रूपये जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आले आहे. तर २० कोटी शासनाकडून पुन्हा मिळणार असल्याची ग्वाही आ.पुâके यांनी पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, गोंदिया -भंडारा लोकसभा पोटनिवडणूक होईल अशा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,राजू वालिया, माजी नगराध्यक्ष कशिश जायसवाल, प्रदिप ठाकुर, संजय मुरकुटे आदि उपस्थित होते.