काँग्रेसचे गाजर लॉलीपॉप वाटप आंदोलन

0
13

भंडारा ,दि.02ः-शेतकरी, बेरोजगार गरीब कष्टकरी लोकांना भूलथापा देऊन सत्ताधारी सरकारने एप्रिल फुल बनविले. त्या निषेधार्थ भंडारा शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी दि. १ एप्रिल रोजी सकाळी गांधी चौक येथे गाजर लॉलीपॉप वाटप आंदोलन केले.
यावेळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केंद्रातील व राज्यातील सरकार हे शेतकर्‍यावर अन्याय करीत असल्याने, शेतकर्‍यांना सरकार आत्महत्या करण्यास प्रवृत्त असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे शेतकर्‍यांचे कर्ज माफ झालेले नाही. तसेच बेरोजगारांना सरकारने वर्षाला २ कोटी नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दिले होते.परंतु ते आश्‍वासन हवेत विरलेत. तसेच महागाईबाबत सरकार जेव्हापासून सत्तेत आली तेव्हा पासून महागाई वाढ झाली आहे. जसे की, सिलेंडरचे दर डबल झालेत. खाण्याच्या तेलाच्या किंमती, पेट्रोल, डीझेलचे दर गगनाला भिडले आहे. या व्यतिरिकत गरीब कष्टकरी लोकांचे जगने कठीण झाले आहे. गरीबांसह सामान्य नागरिकांची तिजोरी खाली करून मोठया उद्योगपतींना हाताशी धरुन, ज्यात अंबानी व अदानीसारख्यांचे तिजोरी भरण्याचे काम सरकार करीत आहे. सर्व प्रकार लक्षात घेता, सत्ताधारी सरकारने जनतेला एप्रिल फुल बनवित आहे. करिता शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने गाजर लॉलीपॉप वाटप करून निषेध आंदोलन केले.
या आंदोलनात महासिचव शरीर वंजारी, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे जि.प.सभापती प्रेम वनवे, धनराज साठवने, महिला काँग्रेस अध्यक्षा भावना शेंडे, कमलेश बाहे, विनीत देशपांडे, रिजवान काजी, सुहास गजभिये, पृथ्वी तांडेकर, सुरेश गोन्नाडे, जीवन भजनकर, अंबादास मंदुरकर, शमीम पठान भारती लिमजे, पराग खोब्रागडे, सचिन हुमणे, विपुल खोब्रागडे, मयूर गजभिये, इरफान पटेल, मोहिश कुरेशी, निखिल कुंभलकर, प्रवीण भोंदे, संजय वरगंटीवार, दीपक गजभिये,वर्गनाथ गोन्नाडे तसेच शहरातील मजूर वर्ग, बेरोजगार युवक व नागरिक उपस्तिथ होते.