सडक अर्जुनीत ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक उत्साहात

0
13

सडक अर्जुनी,दि.02ः -सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची मासिक बैठक रविवार(दि.1)ला स्थानिक इंदिरा गांधी विद्यालयात घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दिनेश हुकरे होते.बैठकीत ओबीसीवर लादलेली अन्यायकारक क्रिमीलेयरची अट रद्द करण्यात यावे.गावागावामध्ये ओबीसी संघटनेची शाखा तयार करुन जनजागृती करणे,ओबीसी जनगणनेसाठी मोहीम राबविण्यासोबतच सदस्यता मोहीमेच्या पावत्या जमा करण्यावर चर्चा करण्यात आली.बैठकिला ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष हरीश कोहळे, ओबीसी सेवा संघ अध्यक्ष भुमेश्वरजी चव्हाण,महिला अध्यक्ष पुष्पाताई खोटेले, बबलु मारवाडे प्रसिद्धी प्रमुख, एच.एस.बावंनकर, काशिवार, देवानंद कुकडे, पी.बी.कठाने, माजी पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, उमराव कठाने, राजेश हुकरे, किशोर शेंडे, टि.आई.कटरे , लक्ष्मण मेंढे, पुरुषोत्तम बावनकर , हेमराज मेंढेसह मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.