मनोहरभाई अकादमीचे उन्हाळी खेळ प्रशिक्षण शिबीर २६ एप्रिलपासून

0
10
गोंदिया,दि.02- मनोहरभाई पटेल अकादमीचे प्रेरणास्त्रोत प्रपुâल्ल पटेल, अध्यक्षा वर्षाताई पटेल,सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात मनोहरभाई पटेल अकादमीचेव्दारा विविध खेळांचे उन्हाळी खेळ प्रशिक्षण शिबीर येत्या २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर हे सकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान राहणार आहे. या शिबीरात ३ ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
या उन्हाळी शिबीरात योगा,नेटबॉल,बॉल बॅडमिंटन,अ‍ॅथलेटिक्स,मार्शल आर्टस,टेनिसबॉल क्रिकेट, पुâटबॉल, हँडबॉल,रायफल शुटींग,स्केटींग व टेबल टेनिस खेळ प्रशिक्षणासोबत व्यक्तमत्व विकासाचे प्रशिक्षण तज्ञांकडून देण्यात येणार आहे. तेव्हा शहरातील विविध शाळांमधील विद्याथ्र्यांनी या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ.अंजन नायडू,रजनी चौबे,डॉ.मृत्यूंजयसिंग,डॉ. निलु बहेकार,डॉ. बी.आर. शर्मा,रूपा मिश्रा,डॉ.देवेंद्र पांडे, डॉ.हरगोविंद चौरसिया,डॉ. एजाज शेख, अजय रूखियाना, आनंद मकवाना, विजय मोहबे,डॉ. प्रवीणकुमार, कार्तिक दास,विजय माने, रवि नेताम, लखन चौव्हाण, शशांक कोसरकर, विद्या द्यानी, हिमांशी साखरकर व अन्य परिश्रम घते आहे. या शिबीरात सहभागी होणाNया विद्याथ्र्यांना गणवेश व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती मनोहरभाई पटेल अकादमीचे संयोजक निखिल जैन यांन दिली.