तामस्यातील नेताजी पालकरांच्या समाधीच्या जिर्णोधार करणार

0
21
नांदेड,दि.2ः- छञपती शिवरायांचे विश्वासु साथिदार,स्वराज्याचे शिलेदार सरसेनापती नेताजी पालकर यांच्या तामसा (ता.हदगाव) येथील समाधीची पाहणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केल्यानंतर त्या समाधीचे जिर्णोध्दार करण्यात येणार असल्याचे सांगितले.तामसा येथे सरसेनापती नेताजी पालकर यांची जिर्ण अवस्थेत समाधी आहे.त्या समाधीची अवस्था अतिशय दयनिय झाली असून शिवछञपतीच्या काळातील सरसेनापती नेताजी पालकरांच्या समाधीचा जिर्णोधार करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा व समाधीचा योग्य आरखडा तयार करुन लवकरात लवकर शासन दरबारी समाधी जिर्णोदाराचा प्रश्न मांडण्यात येईल असे सांगितले.यावेळी त्यांच्यासमवेत पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नेताजी पालकर स्मारक समिती चे सचिव भागवत देवसरकर,तिरुपती भगनुरे पाटील,संजय कदम वटफळीकर,सदस्य बाबुराव वानखेडे,उपाध्यक्ष शिवराज वारकड,पप्पु पाटील कदम,तेजस उंबरकर,बाबुस पवार,शरद पवार,लक्ष्मिकांत दुधकावडे,अंरविद हरन,सुनिल ताकतोडे,विजय कदम,शेख शब्बिर, यांच्चासंह समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी बांधव उपश्थित होते..