श्री.राष्ट्रीय शिक्षण संस्था उत्कृष्ठ संस्था गौरवपुरस्काराने सन्मानित

0
71
गोंदिया,दि.03-येथील श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेला महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन धोरणातंर्गत कोल्हापूर जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सवाच्यावतीने उत्कृष्ठ संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार संस्थेचे सचिव अमृत इंगळे यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील गडqहग्लज येथे आयोजित कार्यक्रमात ऑल इंडिया रेल्वे बोर्ड कमेटी सदस्य शेख जाकिर हुसैन, सेवानिवृत्त मेजर जनरल व्ही.आर.जाधव,जितेंद्रपाल त्यागी,योग विद्यापीठाचे राष्ट्रीय प्रमुख दादा जोशी यांच्या हस्ते स्विकारला.यावेळी इंजि.के.सी.शेलार,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऋषिमाई वडनेरे,महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाचे राज्य अध्यक्ष अनिल मोरे,प्रसिद्ध गायिका व आकाशवाणी निवेदिका रेखा महाजन,राष्ट्रीय क्रीडारत्न सुनीता नाईक,महाराष्ट्र राज्य पर्यटन महोत्सव समिती राज्य समन्वयक उमाजी बिसेन,आयोजन समिति अध्यक्ष अनिता पाटील,राजू पटेल उपस्थित होते.श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना सन १९५२ मध्ये तत्कालीन संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्य संग्राम सैनिक केशवराव लिंगोबाजी इंगले यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती.ती संस्था आजही कायम असून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत आहे.सोबतच सामाजिक कार्यात नेहमीच पुढे राहत असल्याने संस्थेचा गौरव करण्यात आला.संस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्ल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.