शेतीपुरक व्यवसायासाठी घेतलेले कर्जही कर्तमाफीत

0
10
गोंदिया,दि.03-राज्यातील ९० लाख शेतकèयांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके करणारा कर्जमाफीचा ‘जीआरङ्क (शासन निर्णय)निघाल्यापासून आजपर्यंत लाखोच्यां संख्येतील शेतकèयांचे कर्ज माफ झालेले आहे.या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने शेतकरी कुटुंब असा निकष लावला असून पती, पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षांखालील मुलांनाच निर्णयाचा लाभ मिळणार आहे.सोबतच शेतीपुरक व्यवसायासाठी घेतलेल्या जसे ट्रक्टर कुक्कुटपालन,पशुपालन,दुग्धव्यवसाय,शेतीऔजारेआदीसांठी १८ महिन्यापेक्षा जास्त व ८४ महिन्यापेक्षा कमी मुदतीचे कर्ज ज्यांनी घेतले असतील अशा शेतकèयांनाही या योजनेचा लाभ गोंदिया जिल्ह्यात मिळू लागला आहे.
यामध्ये १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१२ पर्यंत दीड लाखापर्यंतची कर्जे माफ होणार आहेत तर दीड लाखाच्या पुढे कर्ज रक्कम असल्यास शेतकèयांना ती कर्जाची रक्कम सेटलमेंट योजनेद्वारे आधी बँकेत भराकी लागणार असून त्यानंतर राज्य सरकार दीड लाखाचा लाभ शेतकèयांना देणार आहे.कर्जमाफीतून अर्बन बँका, मायक्रोफायनान्स संस्था यांना वगळण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकèयांना दिलेले शेती पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज यांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी अशी वर्गवारी करण्यात आलेली नाही.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बँक ऑफ इंडिया परसवाडा शाखेचे व्यवस्थापक काळसर्फे यांना श्री छत्रपती शेतकरी पीक कर्जमाफीतील लाभाथ्र्यांबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सरकार सर्वांनाच कर्जमाफी देत आहे,त्याचा लाभ सर्वांना मिळायला हवा.त्यामुळे आम्ही पीकासोबतच ज्यांनी ट्रक्टरकरीता कर्ज घेतले,विहीरी,पंपावरील पाईप,डेयरी,कुक्कुटपालन या सर्व घटकांचा लाभ घेणाèयांना याचा लाभ शेतकरी घटक म्हणून दिलेला आहे.आमच्या शाखेच्यावतीने फक्त गोल्डलोन,वाहनकर्ज,बचतगट व मायक्रोफायनांसवगळून सर्वांनाच लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले.