लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

0
10

लेनोव्हो कंपनीने लेनोव्हो के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची घसघशीत कपात करण्याचे जाहीर केले आहे.लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गत सप्टेबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. आता याच तब्बल ३ हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना फक्त ७,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

लेनोव्हो के ८ प्लस या मॉडेलमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स २५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यात तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. यामध्ये मायक्रो-एसडी कार्डसाठी स्वतंत्र स्लाट देण्यात आला आहे. यामुळे ड्युअल सीमकार्डचा उपयोग करूनही स्वतंत्र मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविणे शक्य आहे.लेनोव्हो के ८ प्लस या मॉडेलमध्ये फुल एचडी क्षमतेचा (१०८० बाय १९२० पिक्सल्स) आणि ५.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यात छायाचित्रांना बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा दिलेली आहे. तर यात ८४ अंशातील अँगलसह ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे आहे. या स्मार्टफोनमध्ये टर्बो चार्जींगच्या सुविधेने सज्ज असणारी ४,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असून यात डॉल्बी अ‍ॅटमॉस, थिएटर मॅक्स आदी प्रणाली दिलेल्या आहेत. तर या स्मार्टफोनमध्ये स्वतंत्र म्युझिक की देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट आहे.