आदिवासी हलबा/हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

0
12
२० व्या सामूहिक विवाह सोहळ््यात होणार २० जोडपे विवाहबद्ध
गोरेगाव : आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना, आदर्श (सामुहिक) विवाह समितीच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथे सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन रविवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा या समाजाचा २० वा विवाह सोहळा असून यात २० जोडपे विवाहबद्ध होणार आहे.
आदिवासी हलबा/हलबी विवाह सोहळ््याची सुरुवात १९९९ पासून सतत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात करण्यात येते. त्यामुळे आदिवासी समाजात अल्प खर्चात व वेळेची बचत व्हावी तसेच समाज संघटन व्हावा, आदिवासी समाज कर्जबाजारीपासून मुक्त व्हावा, सामाजिक बांधिलकी राहावी यासाठी हे विवाह सोहळ््यांचे आयोजन करण्यात येते. या विवाह सोहळ््याच्या माध्यमातून चालीरिती, भोलीभाषा व विविध माध्यमातून एकोपा ठिकून राहतो. हा विवाह सोहळा आदिवासी समाजाच्या परंपरेनुसारच होणार आहे. या विवाह सोहळ््यात वर-वधू व पालकांचा सत्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात येणार आहे. विशेष करून गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव हा तालुका मध्यस्थी व सोयीचे असल्याने या सोहळ््यात विविध क्षेत्रातून वर-वधूंना आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्य आदिवासी हलबा/हलबी समाज तसेच लोकप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थित राहते.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माजी खा. नाना पटोले, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खोमेश रहांगडाले, माजी आ. दिलीप बन्सोड, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, माजी सभापती पी.जी. कटरे, पं.स. सभापती माधुरी टेंभरे, उपसभापती लीना बोपचे, माजी जि.प. अध्यक्ष प्रल्हाद भोयर, उषा मेंढे, तारणबापू राऊत, शिवलाल गावळ, विजय राणे, पुरुषोत्तम कटरे, जी.आर. राणा, मनिराम मडावी, अमर वºहाडे, तहसीलदार कल्याणकुमार डाहाट, पं.स. सभापती अर्चना राऊत, लक्ष्मीकांत बारेवार, झामसिंग बघेले, मनोहरराव चंद्रिकापुरे, नगरपंचायत अध्यक्ष सीमा कटरे, उपाध्यक्ष आशिष बारेवार, ठाणेदार नारनवरे, भरतसिंग दुधनांग, वीरेंद्र जायस्वाल, जगदीश येरोला, दिलीप चौधरी, माणिक गेडाम, हनुवंत वट्टी, मीना राऊत, राधेलाल पटले आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या विवाह सोहळ््याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श (सामूहिक) विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष नामदेवराव किरसान, उपाध्यक्ष रामचंद्र फरदे, सचिव अजय कोठेवार, एच.बी. राऊत, वाय.सी. भोयर, मुलचंद खांडवाये, सुभाष चुलपार, एच. सी. भोयर, सुनील कोसमे, वीरेंद्रसिंह चाकाटे, सुरज कोयलारे, प्रभुदयाल मसे, जवाहर घासले, विजय कोठेवार, डेव्हिड राऊत, शिवानंद फरदे, झामसिंग भोयर, टी.एम. बिसेन, राजेंद्र दिहारे, रविंद्र पुंगळे, शंकर कोठेवार, आरती चवारे, वैशाल कोठेवार, निलाराम नाईक शिवशंकर राऊत, जी.एस. खांडवाये, गोविंदा भोयर, डि.जी. कोल्हारे आदींनी केले आहे.