जयस्तंभ चौकातील प्रवासी निवाèयासमोरच अवैध वाहतुक व दुकानदारांचे अतिक्रमण

0
18

गोंदिया,दि.05-शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ चौकात प्रशासकीय इमारतीच्या शेजारी राज्यपरिवहन विभागाच्यावतीने छोटेसे बसस्थानक तयार करण्यात आलेले आहे.या बसस्थानकात नागपूर-देवरी मार्गाकडे जाणाèया सर्व बसेसंना थांबा देण्यात आलेला आहे.तर प्रवाशासांठी प्रवासी निवाराही तयार करण्यात आला आहे.परंतु या प्रवासी निवाèयाच्या समोरच ऑटोचालक आपली वाहने उभी ठेवत असल्याने तसेच काही दुकानदारांनी मोकळ्या जागेवर आपली दुकाने थाटल्याने राज्यपरिवहन विभागाच्या बसेसना मात्र अध्र्यारस्त्यावर थांबविण्याची वेळ आली असून याप्रकारामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.विशेष म्हणजे शासनाच्या धोरणानुसार बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कुठलेही वाहन उभे ठेवता येत नाही असे असताना मात्र जयस्तंभच्या बसस्थानकासमोर ऑटोचालक अर्वाच्यशब्दांच्या वापर करीत आपली वाहने त्याठिकाणी उभी ठेवत असल्याचे बघावयास मिळते.याच ठिकाणाला लागून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,न्यायालय,उपवनसंरक्षक कार्यालय व वाहतुक पोलीसांचे कार्यालय असतानाही त्यांचे डोळे बंद का अशा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातही वाहतुक पोलीस त्यांना हटविण्याएैवजी त्या अवैधप्रवासी वाहतुक करणाèयां आटोचालकांनाच पाठबळ देत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.तर प्रवासी निवारासमोर दुकान थाटणाèयांनी आम्ही बेरोजगार,सर्वसामान्य असे सांगत शासकीय नियमांनाच पायदळी तुडविण्याचे काम सुरु केले आहे.यादोघामुळे मात्र जयस्तंभ चौकातील प्रवासी निवारा हा अपघातप्रवणस्थळ होण्याचा मार्गावर आल्याने जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस अधिक्षक किमान प्रवासी निवारासमोरील खासगी दुकाने व ऑटोचालकांचे अस्थायी अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेणार काय अशा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.प्रवासी निवारासमोर दुकान थाटणाèयांना काही राजकीय नेत्यांसोबतच मिडीयातील काही लोकांचेही समर्थन असल्याची चर्चा आहे.
प्रवासी निवाèयासमोरील अर्धारस्ता या दुकानदारांनी व ऑटोचालकांनी आपल्या ताब्यात घेतल्याने परिवहन महामंडळाच्या एसटी बसचालकांना यांच्या मनमानी कारभारामुळे त्रास सहन करण्याची वेळ आली असून बस मुख्य मार्गावरील दुभाजकापासून काही अंतरावर थांबविण्याची वेळ आली आहे.हे चित्र त्याभागात दिवसभर उभ्या असणाèया वाहतुक पोलीसांना दिसत असतानाही ते काहीही करीत नसल्याने या सर्व प्रकरणात आत्ता मा.न्यायालयानेच पोलीस विभागाला समज देत या जयस्तंभ चौकातील प्रवासी निवाèयासमोरील जागा राज्य परिवहन बसेसच्या थांब्यासाठी मोकळी करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.या चौकातून जेव्हा सिग्नलनुसार वाहने सोडली जातात त्यावेळी फुलचूरकडे जाणाèया जयस्तंभचौकातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे अनेकदा बघावयास मिळते.बेरोजगार व मागासवर्गीय असल्याचे कारण पुढे करुन रस्त्यावर दुकान थाटण्याचा प्रकाराला आळा घातला गेला पाहिजे.बेरोजगारानेही रोजगार अतिक्रमण न करता व्यवसाय केला तर त्यालाही कुणी विरोध करणार नाही,परंतु त्यांच्या अतिक्रमणामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर त्यांच्या अतिक्रमित वृत्तीचा विरोध व्हायलाच पाहिजे,त्याशिवाय वाहतुक व्यवस्था सुधारणार नाही.कधी कधी तर या दुकानदार व ऑटोचालकामूळे अनेकदा एसटी बसचालक एक मिनिटही बस न थांबविताच निघून जात असल्याचेही बघावयास मिळते.दुचाकीचालकही आपल्या वाहन वेगाने नेत असताना याठिकाणी अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत.गेल्या आठवड्यातच रस्ता ओलांडताना एका महिलेने इकडे तिकडे न बघताच रस्ता ओलांडला आणि दुचाकीच्या समोर आली.जेव्ही की त्या दुचाकीचालकाची चूक नव्हती परंतु त्या चौकातील असामाजिक तत्वांनी त्या दुचाकीस्वार युवकालाच मारहाण करुन आपली दादागिरी दाखविण्याचा प्रकार केल्याची चर्चा आहे.अशा घटना या असामाजिक तत्वामुळे या चौकात वाढू लागल्याने सामान्य व चांगल्या प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला आहे.
या प्रवासी निवाèयासमोर नेहमीच प्रवाशांची एवढी गर्दी असते की परिवहन मंडळाची बस आलेली असतानाही खासगी प्रवाशीचालक आपली वाहने त्याठिकाणीच मग्रुरीने उभी ठेवतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे खासगी वाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली असून प्रवासी निवाèयासमोरील सर्व दुकानदारांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्याची गरज निर्माण झाली आहे.ते अतिक्रमीत दुकानदार हटत नसतील तर पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडून याठिकाणी कुठलीही घटना घडल्यास त्याचे आर्थिक नुकसान जे होईल त्याची जबाबदारी तुमचीच राहिल अशी भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई केल्यास सामान्य प्रवाशांना अडथळा होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.