तांत्रिक अधिकारी गेडाम व सहा.कार्यक्रम अधिकारी टेंभुर्णे १० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

0
15

गोरेगाव,दि.०५ः गोरेगाव पंचायत समितीतर्गंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत कंत्राटी तांत्रिक अधिकारी सुनिल रायभान गेडाम व सहायक कार्यक्रम अधिकारी विलास मधुकर टेंभुर्णे यांना १० हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या मोठ्याभावाच्या नावे ग्रामपंचायत खाडीपार येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतीसाठी सिंचन विहीरीकरीता अर्ज केला होता.त्यानुसार त्या यादीमध्ये त्यांच्या भावाचे नाव सुद्दा आले होते.त्याकरीता लागणारे सर्व कागदपत्र त्यांनी सोबत जोडले होते.त्यावेळी तांत्रिक अधिकारी गेडाम यांनी विहिरप्रकरणास प्रशासकीय मान्यता मिळवून प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे पाठविण्याकरीता २० हजाराची मागणी केली होती.

परंतु तक्रारदारास रक्कम द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १५ फेबुवारी रोजी तक्रार नोंदविली होती.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून पडताळणी करण्यात आली.या पडताळणीदरम्यान सुनिल गेडाम यांनी तक्रारदाराकडे १५०० रुपयाचे मागणी केली.तसेच सहा.कार्यक्रम अधिकारी विलास टेंभुर्णे यांने प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर गेडाम व स्वतःकरीता १० हजाराची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दाखविली.त्यावरुन दोघाविरुध्द गोरेगाव पोलीसस्टेशन येथे कलम ७ अन्वये आज ५ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक दिलीप वाढणकर,दिवाकर भदाडे,राजेंद्र शेंदे यांच्यासह लाचलुचपत विभागातील कर्मचाèयानी केली