सुकळी गावातील अनेक युवकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश 

0
24

तुमसर,दि.05 : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी गावातील अनेक तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढनारा पक्ष तथा छत्रपती शिवाजी माहाराजांचा विचारधारेवर चालनारा पक्ष तो म्हणजेच शिवसेना या पक्षावर विश्वास ठेवुन शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ०४.०४.२०१८ बुधवारला ग्रामीण भागातील युवकांनी पक्षप्रवेश घेतला. या पक्षप्रवेश वेळी शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विक्रांत तिवारी, खापा सर्कल विभागप्रमुख ईश्वर भोयर, संजय झंझाड, सचिन मोहतुरे उपस्थित होते. यावेळी पक्ष प्रवेश करताना विनोद ढेंगे, दीपक बांडेबुचे, अतुल बडगे, शैलेश केरेकार, शिवनाथ राऊत, विलास ठवकर, उमेश फेंडर, शुभम ठवकर, रितेश साहारे, दिनेश हिंगे, आशीष टेकाम, आकाश गोमासे, लिकेश सपाटे, निखिल भोयर, गुलाब बांडेबुचे, राहुल बांडेबुचे, सचिन चौधरी, मुकेश टेकाम, विक्की ठवकर, अश्विन चौधरी, श्रीदास कांबळे, विष्णु बांडेबुचे सह अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला.