ताडोबातील पाणवठ्यावर तहानभागवितांना वाघोबाचा कुटुंब

0
12

नागपूर,दि.06(विशेष प्रतिनिधी)-,ऊन्हाच्या वाढत्या तडाख्याने मानवासह वन्यजीवही मेटाकुटीला आले आहेत. राज्यभरात अनेक शहरात पारा चाळीशीपार पोहोचल्याने घामाच्या धारा निघत आहेत. चंद्रपूर जिल्हयातही उन्हाळ्याचे चटके बसायला लागले असून पारा ४३ अंशावर पोहचला आहे. कडक उन्हामुळे जंगलातील पाणवठे सुकल्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन विभागाने कृत्रीम पानवठे तयार केले असून या पाणवठयावर वन्य प्राण्यांनी गर्दी केली आहे.त्यातच ऊन्हाळ्यात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार व पर्यटकांनी ताडोबामध्ये गर्दी केली आहे. ताडोब्यातील कोळसी  येथील एका पाणवठ्यावर पट्टेदार वाघीन आपल्या दोन छाव्यांसह पाणी पिण्याकरीता आल्याचे छायाचित्र हौशी पर्यटक आणि छायाचित्रकार श्वेतकमार रंगा राव यांनी टिपले आहे.