गोंदिया भाजपातर्फे स्थापना दिवस उत्साहात

0
11
गोंदिया,दि.६ः- भारतीय जनता पक्षाच्या ३८ वा स्थापना दिवस भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक भरत क्षत्रीय यांच्या हस्ते पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक भरत क्षत्रीय होते. यावेळी कशिश जायस्वाल, नंदकुमार बिसेन, प्रदिपसिंग ठाकूर, विनोद किराड, मिनू गडबुजर आदीं उपस्थित होते.दरम्यान मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संजय कुळकर्णी, बाबा बिसेन, अमित झा, संजय मुरकुटे, धमेंद्र डोहरे, मुकेश हलमारे, राजू वंजारी, अशोक जयसिंघानी, अजय लौंगाणी, धनंजय रिनायत, संतोष पटले, गोल्डी गावंडे, विनोद चांदवानी, मंगलेश गिरी, रामेश्वर लिल्हारे, पंचभाई, लक्ष्मी बावनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अहमद मनियार यांनी केले तर आभार ॠषीकांत साहू यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.