मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

अमेरिकेत मंदिरावर हल्ला, भिंतीवर लिहीले ‘गेट आऊट’

वॉशिंग्टन, दि. १७ – अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे अज्ञात हल्लेखोरांनी मंदिरावर हल्ला करत मंदिराच्या भिंतीवर ‘गेट आऊट’ असा संदेश लिहील्याने वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्याचा स्थानिक प्रशासनाने तपास सुरु केला असून या घटनेचा स्थानिक भारतीयांनी निषेध व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टनमधील सिएटल शहरात हिंदूंचे मंदिर असून उत्तर पश्चिम अमेरिकेतील हे सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर मंगळवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली आणि मंदिराच्या भिंतीवर वादग्रस्त संदेशही लिहीला. वॉशिंग्टनमधील हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक केंद्र बोर्डाच्या ट्रस्टी नित्या निरंजन यांनी या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली. ‘अमेरिकेत अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षीत नाही, अमेरिका हे प्रवासी राष्ट्र म्हणूनच ओळखले जाते’ असे निरंजन यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी मंदिराच्या भिंतीवर अज्ञात व्यक्तींनी चित्र काढले होते. यावर मंदिर प्रशासनाने आक्षेप घेतला नव्हता. तसेच त्याची तक्रारही केली नाही. पण आता मंदिराबाहेर तोडफोड व हिंदूंना धमकी देणारे संदेश लिहीले गेल्याने स्थानिक भारतीयांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात अमेरिकेत हिंदूचे मंदिर व प्रार्थनास्थळावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

भारतीय तरुणाची हत्या
अल्बामा येथे एका वयोवृद्ध भारतीयाला स्थानिक पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच न्यू जर्सी येथे एका भारतीय वंशाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. अमित पटेल असे या तरुणाचे नाव असून त्यांचा न्यूजर्सीत मद्यविक्रीचा व्यवसाय आहे. अमित शॉपमध्ये बसले असताना एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

Share