१० एप्रिलच्या बंदला ओबीसी संघटनांचा विरोध

0
11
गोंदिया,दि.०७ः- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आज येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकित येत्या १० तारखेला आवाहन करण्यात आलेल्या बंदला विरोध असल्याचा ठराव पारीत करीत ओबीसी समाज व संघटना आरक्षणाचा समर्थन करीत असल्याचा निर्णय ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.तसेच ओबीसींनी आपल्या सवैंधानिक आरक्षण हक्कासाठी संघर्षरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक आनंदराव कृपाण,ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष सावन कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष कैलास भेलावे,राजेस नागरीकर,महासचिव शिशिर कटरे,सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे,डॉ.संजिव रहागंडाले,एस.यु.वंजारी,सुनिल भंोगाडे,कृष्णा बहेकार,हरिष ब्राम्हणकर,प्रमोद बघेले,संतोष खोब्रागडे,पी.डी.चव्हाण,जिवनलाल शरणागत ,जितेश राणे,तुलसीदास झंझाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ओबीसी संघटनेच्या सदस्यता मोहीमेबद्दल चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे येत्या २९ एप्रिलला गोंदिया जिल्ह्यात येत असलेल्या सैविधानिक ओबीसी हक्क जनजागरण यात्रेनिमित्त गोंदियातील शास्त्री वार्डात जाहीरसभा घेण्याचे ठरविण्यात आले.त्याचप्रमाणे ११ एप्रिलला नागपूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाकडे ओबीसीमध्ये प्रगतजातींचा समावेश करण्यात येऊ नये,त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ठ न करता स्वतंत्र आरक्षण सरकारने द्यावे.ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी जनजागृती करुन घटनेच्या कलम ३४० चा लाभ व ओबीसींची जनगणना करण्यासाठी समाजप्रबोधन करण्यावर चर्चा करण्यात आली.तसेच जिल्हा कार्यकारीणीच्या विस्ताराला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.सभेचे संचालन प्रमोद बघेले यांनी केले,आभार कैलास भेलावे यांनी मानले.