वीरांगणा महाराणी अवंतीबाई भारताच्या गौरव-विशाल अग्रवाल

0
11
गोंदिया,दि.07ः-  वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी ब्रिटीश काळात इंग्रजांना हादरवून सोडले होते. इतिहासकारांनी अंवतीबार्इंना प्रसिद्धी दिली नसली तरी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये महाराणी अवंतीबार्इंचे मोठे योगदान असून त्यांना कधीच विसरल्या जाऊ शकत नाही. राणी अवंतीबाई त्या वीरांगणा आहेत. त्यआंचे नाव सोनेरी अक्षरात लिहायला पाहिजे. कारण त्या भारताच्या गौरव असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेता विशाल अग्रवाल यांनी केले. ते  महाराणी अवंतीबाई यांच्या १६० व्या बलीदान दिनानिमित्त कारंजा येथे लोधी समाजाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा काँग्रेसचे कमेटीचे महासचिव अमर वNहाडे, पं.स.सदस्य योगराज उपराडे, पं.स.उपसभापती चमन बिसेन,सरपंच धनवंताबाई उपराडे, महेंद्र शहारे, शिवराम सव्वालाखे, लिखीराम बन्नोटे, राणु नागपुरे, गजानन नागपुरे, महेंद्र नागपुरे, उमेश सिलोके, मुन्नालाल दमाहे,चैनलाल गराडे, राजहंश लिल्हारे, शिवप्रसाद उपराडे, मधुकर नागपुरे, दिनेश बन्नोटे, भिवराम दमाहे,रेवानंज गराडे, तुलसीबाई ढेकवार, मंगला रणदिवे, इंजि राजीव ठकरेले, रमेश लिल्हारे, आशिष नागपुरे, विजय वाघाडे अन्य उपस्थित होते. दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लोधी अवंतीबाई चौकातून भव्य रथयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा बहुसंख्य नागरिकांनी घेतला.