अनेकाकडून होतेय नळ योजनेच्या पाण्याची चोरी

0
18

आमगाव,दि.07(महेश मेश्राम) : येथील नगर परिषद व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने भीषण उन्हाळ्याचे परिणाम लक्षात घेता प्रशासनाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना केली आहे. पाणी पुरवठ्यादरम्यान विद्युत पंपांनी पाण्याची चोरी करणाऱ्यांची गंभीर दखल घेत कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उभारण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे. आमगाव नगर परिषद क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची अनेक नागरिक विद्युत मोटर पंप लावून जास्त प्रमाणात चोरी करतात. त्यामुळे उर्वरित नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाईमुळे पुरवठा करणारे धरण, नदी, पाण्याचा साठा असलेले तलाव कमी पावसामुळे अगोदरच ओसाड पडले आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर आता टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
नगर परिषद क्षेत्रासह तालुक्यात खासगी विहिरी, शासकीय विहिरी, विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने कायद्याचा आधार घेवून उपाय योजना सुरू केली आहे.शासकीय विहिरी, विंधन विहिरी तसेच सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची विद्युत पंपाने अधिक पाण्याची चोरी करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य मार्ग निघणार आहे. नगर परिषद क्षेत्र व तालुक्यातील पिण्याचे पाणी पुरवठा करताना विद्युत मोटारपंपाद्वारे चोरी करणाºयांवर चाप बसावा यासाठी भारनियमातून पिण्याचे पाणी नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळेल, यासाठी विद्युत विभागाला भारनियमनाकरिता पत्रव्यवहारही प्रशासनाने केल्याची माहिती मिळाली आहे.
नळ योजनेतून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी नळ जोडणीकरिता विस्तारीकरणाचे कार्य नियोजित आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होत नाही अशा भागात पाईप टाकण्यासाठी प्रस्ताव, नियोजन करण्यात येत आहे. नळ जोडणी धारकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी उपाययोजना कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी यात सहयोग करावा, असे आवाहन तहसीलदार व नगर परिषद प्रशासक साहेबराव राठोड यांनी नागरिकांना केले आहे.