आंधळगाव ठाणेदाराच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोरात? 

0
48
सालई खुर्द/मोहाडी(नितिन लिल्हारे),दि.07 : मोहाडी  तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्या गावामध्ये सामान्य व्यक्तींना त्रास झाला नाही.पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा अवैद्य बैल बाजार, रेती वाहतूक,दारू, मटका, जुगार, अपघात, कोंबडा बाजार व गुटखा विक्री अशा धंद्याला आळा बसला होता. मात्र जेव्हा पासून अरुण गुरनुले यांनी आंधळगावच्या ठाणेदाराची सुत्रे स्विकारली तेव्हापासून अवैद्य धंद्याला ऊत आल्याची चर्चा परिसरात सुरु झाली असून राजरोसपणे अवैद्य धंदे जोरात सुरू  झाल्याने बोकाळलेल्य़ा अवैध धंद्याला लगाम कोण घालणार? अशा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पोलीस यंत्रणाच अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याने तालुक्‍यातील अवैध धंदेवाल्यांना एकप्रकारचे प्रोत्साहनच मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.श्री क्षेत्र गायमुख देवस्थान असलेल्या पवित्रस्थान येथे दारूच्या महापुर सुरु असून याबरोबर जांब, कान्द्री आंधळगाव, वळेगाव अशा मोठ्या गावात सुद्दा दारू विक्री सुरू आहे.  पुरातन काळातील आंबागड किल्लाजवळ गावाच्या शेत शिवारात राजरोस पणे अवैद्य जनावरांचा बैल बाजार भरतो. या बैल बाजारात मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या संख्येने आणली जातात.विक्री झालेली ही जनावरे आंबागड वरून रामपूर, गायमुख, जांब या मार्गाने कामठी येथे जात असून आंबागड वरून सिहरी, सालई खुर्द, आंधळगाव शिवणी वरून बडोदा या मार्गाने  अवैद्य जनावरांची वाहतुक खुलेआम सुरु असतानाही पोलीस प्रशासन मात्र काहीही करीत नसल्याने ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होऊ लागली आहे.
पोलीस स्टेशनच्या समोरूनच ट्रॅक्टरने रेतीची तस्करी होत आहे.रेतीचे ट्रॅक्टर व अवैद्य जनावरांचे वाहन गावातून भरघाव वेगाने जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. ठाणेदार गुरनुले यांनी दि. 28 मार्च ला रात्री 8 वाजेच्या सुमारास रेतीचा ट्रॅक्टर वाहतूक करीत असतांना डोंगरगाव आंधळगाव मार्गावर ट्रॅक्टर क्रमांक MH36L 1699 पकडला.त्या ट्रक्टरचालकाकडे राॅयल्टी नसतानाही कडक कारवाई न करता ट्रक्टर त्वरीत सोडल्याने शंकाकुंशकांना पेव फुटले आहे.
एखादी पोलीस अधिकारी व  कर्मचारी अवैद्य धंद्याला आळा घालण्याचा प्रयत्न करतो तर पोलिस निरीक्षक यांचा दबावात त्यांना सोडावे लागते. शेवटी लहान कर्मचारी सुद्दा बंधनात पडले आहे. ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक मुळे त्रासल्याची चर्चा आहे.काही पोलीसांना वाहतुक पोलीसांच्या नावावर पाठवून अवैध व्यवसायकिकांडून वसुली करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.