उपलब्ध संशाधनातून चांगली आरोग्य सेवा देण्याचे कार्य करा-सीईओ दयानिधी

0
26
डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण
गोंदिया,दि.०७ः-सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी उपलब्ध करुन देण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने शासन करीत आहे.ती आरोग्य सेवा आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रुग्णनागरिकांला उपलब्ध असलेल्या संशाधनातूनच देण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांनी केले.तसेच  चांगल्या पध्दतीचे काम करण्यासाठी शासनाने धोरण तयार केलेले आहे.त्या धोरणाची अमलबंजावणी आपण कशापध्दतीने करुन त्याचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोचवितो यावरच आपले कलाकौशल्य टिकून असते.कमी निधीमध्ये चांगली सेवा देतांना आपण कार्यतत्पर राहणे जेवढे महत्वाचे आहे,तेवढेच आपली कार्यक्षमता व कर्तव्यदक्षता पाहिजे.आज अर्जुनी मोरगाव व सालेकसा तालुक्यातील आदिवासी गावातील आरोग्य केंद्रांनी पटकावलेले पुरस्कार हे त्यां केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव आहे.तो गौरव आपण सर्वांनी मिळविण्यासाठी स्पर्धात्मक आरोग्यसेवा देतांना काळजी घेणे महत्वाचे असल्याचे विचार व्यक्त केले.ते गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आज ७ एप्रिलला आयोजित जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमातंर्गत डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले होते.मंचावर माजी सभापती विमल नागपूरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक,समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ अनंत वालके,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.चौरागडे,डॉ.चांदेवार यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा.एच.एच.पारधी व खेमेंद्र कटरे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने माता व बालकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट काम करणाèया संस्था व व्यक्तिकरिता डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांनी जर त्या सेवेत मनझोकून काम केले तर त्यांच्या कार्याची नक्कीच वाहवा केली जाते.आजच्या घडीला एकोडी येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.अग्रवाल यांच्यासह अनेक वैद्यकिय अधिकाèयांच्या कार्याचा उल्लेख जेव्हा नागरिक करतात तेव्हा आपणास आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळत असल्याचा आनंद होतो.तो आनंद असाच टिकून ठेवण्यासाठी आपणासर्वाची जबाबदारी आहे.त्यातच जे चुकीचे करीत असतील त्यांना शिक्षाही झाली पाहिजे असे सांगत जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या आणि परिसराच्या १० किमीमध्ये कुठलाही खासगी रुग्णालय qकवा दवाखाना नसताना आपल्या आरोग्य केंद्रातून रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल कोरंभीटोला,चोपासह आदिवासीभागातील दरेकसा व बिजेपारच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाèयांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला.आपण आपल्या कार्यकाळात अधिकाधिक चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचेही सांगितले.
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने माता व बालकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट काम करणाèया संस्था व व्यक्तिकरिता डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार २०१७-१८ मध्ये  जिल्ह्यातील आमगाव ग्रामीण रुग्णालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार वैद्यकिय अधिकारी डॉ.शोभना qसह यांच्यासह त्यांच्या सहकाèयांनी स्विकारला. प्राथमिक आरोग्य केंद्र गटामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रांला प्रथम पुरस्कार देण्यात आला.गोरेगाव तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राला द्वितीय पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.राध्येशाम पाचे,डॉ.सुलभा सोनकनवरे,आर.मेश्राम,एन.मेश्राम,श्री.बावनकुळे,श्रीमती कोडापे,श्रीमती बोरकर,श्री.उईके,श्रीमती मरकाम यांच्यासह कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्विकारला.तृतीय पुरस्कार सालेकसा तालुक्यातील बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्विकारला.त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रथम क्रमांक सालेकसा तालुक्यातील जमाकुडो,द्वितीय क्रमांक तिरोडा तालुक्यातील लाखेगाव व तृतीय क्रमांक गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील आरोग्यसेविका व वैद्यकिय अधिकारी यांनी स्विकारला.यापुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विचार व्यक्त करतांना माजी सभापती विमल नागपूरे यांनी बीजीडब्लू व केटीएस रुग्णालयामध्ये सामान्य व गरीब महिला रुग्णांशी होत असलेल्या वेदनादायी प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करीत आरोग्य सेवा देतांना सेवा विसरल्याचा भास होत असल्याची टिका केली.तसेच अ‍ॅलोपॅथीसोबतच आर्युवेदाचा वापर अधिक व्हावा अशी इच्छा व्यक्त करतांनाच जिल्हास्तरीय कार्यक्रमाला जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांसह आरोग्य समितीच्या सदस्याच्या अनुपस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी आरोग्यसेवा राबवितांना अधिकारी,कर्मचारी यांनी रुग्णसेवेचाव्रत कसा पार पाडायचे या आधारेच यावर्षीचा कार्याक्रमाचे आयोजन असल्याचे सांगत ग्रामीण व आदिवासीभागातील उत्कृष्ठ काम करणाèयाचे अभिनंदन केले.यावेळी उपस्थितांनीही आपले विचार व्यक्त केले.प्रास्तविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले.तर संचालन डॉ.भुमेश पटले व आभार डॉ.चांदेवार यांनी मानले.आयोजनासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले
5 Attachments