लिटील फ्लावर शाळेत ७०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

0
34

* जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यविषयक कार्यशाळा
लाखनी,दि.08ः-आरोग्य संवर्धन हे महत्वपूर्ण आहे. सुदृढ़ आरोग्यासाठी योग्य आहार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. शाळा हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. याठिकानी विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यास येतात आणि म्हणून शाळांच्या माध्यमातुन आरोग्य शिबिरे, आरोग्यविषयक कार्यशाळा असे उपक्रम घेतले जावेत त्यासाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन नीमा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. चन्द्रकांत निम्बार्ते यांनी केले. तसेच या शिबिराच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेतला म्हणून लिटिल फ्लावर स्कुलचे देखील अभिनंदन केले.
नीमा संघटना आणि द लिटिल फ्लावर स्कुल लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त लिटील फ्लावर स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.या आरोग्य शिबिरात जवळपास ७०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. चंद्रकांत निम्बार्ते यांच्यासह डॉ. गणेश मोटघरे, बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद भूते, नेत्ररोगतज्ञ डॉ. सचान, त्वचारोगतज्ञ डॉ. टिकेश्वर करंजेकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. मुक्ता आगाशे, डॉ. हजारे मॅडम, डॉ. हर्षाली सेलोकर अशी ८ डॉक्टरांची चमु यावेळी उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी यावेळी सर्व डॉक्टरांशी संवाद् साधला आणि तपासणी करून घेत शंकानिरासन करून घेतले.
“मुलींचं आरोग्य” या विषयावर मुलींसाठी एका कार्यशाळेचे देखील आयोजन याप्रसंगी केले होते. या कार्यशाळेला डॉ. मुक्ता आगाशे यांनी मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे आजार दूर ठेवण्यासाठी स्वताच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सकस आहार काय घ्यावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
समारोपिय कार्यक्रमात द लिटील फ्लावर स्कुलच्या प्राचार्या आशा वनवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुदृढ़ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, चांगला आहार त्यांनी घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत सर्वतोपरी मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले.
या उत्कृष्ठ उपक्रमासाठी लिटिल फ्लावर स्कुलचे सहा. शिक्षक प्रशांत वाघाये यांनी शाळेच्या वतीने सर्व डॉक्टर्सचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक आशीष बडगे, शिक्षकवृंद विशाल हटवार, अनमोल भोयर, कृष्णा उइके, दामोधर गिरिपुंजे, विजय उरकुडे, वर्षा पंचबुद्धे, पुष्पा मानकर, मीनाक्षी डोरले, नुसरत शेख, छाया बावनकुळे, अलका खटके, पूजा गोतमारे, विद्या फरांडे, अंजली कानतोडे, स्वाती ढेंगे, प्रतिक्षा बंसोड, रीटा धांडे, ज्योती साठवणे, रूपा मस्के, शीतल इरुरकर, प्रिया ठाकरे तसेच कर्मचारी सुरेश वाघाये, मोहन सार्वे, वीरांगना बंसोड, सुनीता गभणे यांचे विशेष सहकार्य लाभले.