मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी# #कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

गोेेरेगावच्या माॅडेल काॅन्व्हेंटमध्ये पालक सभा उत्साहात

गोरेगाव,दि.08ः-येथील मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये 6 एप्रिल रोजी पालक सभेचे आयोजन करुन पालकांच्या समस्यांचे निराकारण करण्यात आले.यावेळी पालक व शिक्षकांच्या समन्वयासोबतच शिक्षणपध्दतीवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.पालक शिक्षक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थाध्यक्ष आर डी कटरे होते. तसेच दिलीप जैन,विवेक जैन, महेंद्र जैन,नगरसेवक सुरेंद्र पटले,गोरेगावच्या नगराध्यक्ष सीमाताई कटरे, सौ सुरेखाताई कटरे,मुख्याध्यापिका छाया पी. मेश्राम,नितीन चौरे मंचावर उपस्थित होते.यावेळी दिलीप जैन यांनी आपल्या मार्गदर्शनातून UCMAS द्वारे विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक जीवनात होणारे फायदे समजावून सांगितले. तसेच या पालक सभे प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आर.डी.कटरे यांनी पालक सभेला मार्गदर्शन करतांना शाळेत देण्यात येत असलेल्या भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची हमी दिली.यावेळी UCMAS शिकलेल्या विद्यार्थ्याकडून पालकांसमोर प्रेझेन्टेशन सादर करण्यात आले.विद्यार्थांच्या गुणांना पालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी 11 ते 26 एप्रिल दरम्यान आयोजित समर कॅम्पबद्दल पालक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.संचालन पदमाकर महाजन यानी केले,तर आभार पी.सी.बघेले यांनी मानले.

Share