येगावच्या विद्यार्थ्यांची पाखरांसाठी प्राकृतिक पाणपोई

0
15

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे),दि.08ः-तालुक्यातील येगांव हे छोटंस गाव.या गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांनी No Speech ग्रुप स्थापन करून दोन तास गावासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.दर रविवारला दोन तास आपल्या गावासाठी देत स्वच्छता मोहिम राबवितात.त्यातच आज आपल्या दोन तासातील स्वच्छतेची मोहीम आटोपून सर्व विद्यार्थी गावातील वडाच्या झाडाजवळ एकत्र आले.तेव्हा त्यांच्या हाती विशिष्ट पध्द्तीने कापलेले दूधी भोपळे होते. गावकरी मोठ्या आतुरतेने आज काय वेगळे करतात ते पाहत होते. प्रत्येकांनी आपआपल्या घरुन तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी व पाणी आणून या कापलेल्या दूधीभोपळ्यामध्ये भरले.”या उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या वाटसरुंसाठी आपण पानपोई सुरु केली. पण या उडणाऱ्या पाखरांना या उन्हात चाऱ्या -पाण्याची होणारी अड़चन लक्षात घेत त्यांच्यासाठी दुधीभोपळ्याच्या माध्यमातून पाणपोईसोबतच अन्नधान्याची व्यवस्था करण्याचा केलेला उपक्रम गावातील प्रत्येकांच्या मनात घर करुन गेले आहे.या समुहासाठी पुढाकार घेणारे शिक्षक भूषण लोहारे आणि त्यांचे सहकारी मित्रांनी ” चिऊ ये दाना खा- पानी पी – भुरकन उडून जा , कोयल ये …………, बुलबुल ये ………. , अशा विविध पक्ष्याना आमंत्रण देत त्या पक्ष्याना सोयीस्कर अशाठिकाणी ते दुधीभोपळे लावत  होते.

लोहारे यांनी सांगितले की , “या उन्हाच्या तडाख्याने तहानलेल्या वाटसरुंसाठी आपण पानपोई सुरु केली पण या उडणाऱ्या पाखरांना या उन्हात चाऱ्या -पाण्याची फार अड़चण भासते. ती दूर करण्यासाठी आपण पाखरांसाठी ही प्राकृतिक पानपोई निर्माण केली आहे. आपल्याकड़े विविध पक्ष्यानी यावे दाना- पानी घ्यावा व सुरक्षितता अनुभवावी यासाठीच आपले  प्रयत्न आहेत. पक्ष्यासाठी ठीक ठिकाणी प्लास्टिक बॉटल, डपकी, डिस्पोजल वाट्यांचा उपयोग करतात पण ते प्राकृतिक नाही.एकीकडे आपण प्लास्टिकचा विरोध करतो व पक्ष्यांना प्लास्टिकमध्ये पाणी पाजतो या पेक्षा आपण प्रकृतिद्वारे उपलब्ध साधनांचा वापर करण्याच्या दृष्टीने दूधी-भोपळ्याचा वापर केला.आपले पूर्वज सुद्धा दूधी-भोपळ्यात पानी भरून पिण्यासाठी वापरायचे. दूधी-भोपळ्यांना योग्य प्रकारे कापून त्यात पानी, तांदुळ, गहु, ज्वार, बाजरा, आदि चारा- पानी ठेऊन छोट्या-मोठ्या वडाच्या, करंजी, चिंचेच्या झाडांवर बांधले गेले आहे.या प्रयोगातून विद्यार्थ्यांमध्ये पशु-पक्षीबद्दल प्रेमही निर्माण होते.सोबतच पक्षी अन्न साखळीतील महत्वाचा घटक असल्याने त्याची जोपासणा करणे आपली जबाबदारी असल्याची जाणीव यामाध्यमातून विद्यार्थी- गावकारी यांच्यात करण्यासाठी केलेल्या या छोटेश्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे