केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी

0
17

अहमदनगर,दि.08(विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना  जिल्हा न्यायालयाने १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम, बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा यामध्ये समावेश आहे.रात्री आमदार जगताप यांना अटक केल्यानंतर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौघांना न्यायालयात हजर करण्यात आल. पोलीसाच्या वतीने घटनेच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अडीच वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. काल झालेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली होती. तत्पुर्वी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तर भानुदास कोतकर आणि बाळासाहेब एकनाथ कोतकर या तिघांना पोलीसांनी अटक  केले.या चौघांनाही १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.