मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #अखेर सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलावर अंत्यसंस्कार......# #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी

ईजिप्तच्या इसिसवरील हल्ल्यांत 50 ठार

कैरो – इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने ईजिप्तच्या 21 नागरिकांचा शिरच्छेद केल्यानंतर संतप्त ईजिप्तने लीबियामध्ये इसिसवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 50 जण ठार झाले आहे. लीबिया व ईजिप्तच्या हवाईदलांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये इसिसच्या तळांवर जोरदार बॉंबफेक केली. सक्र अल-जरौशी या लीबियाच्या हवाई दल प्रमुखांनी यासंदर्भातील माहिती दिली. लीबिया व ईजिप्तमध्ये या मोहिमेसंदर्भात “मोठे सहकार्य‘ असल्याचे जरौशी यांनी सांगितले.

इसिसने लीबियामधील एका समुद्रकिनारी अपहृत 21 ख्रिश्चन नागरिकांची हत्या केली. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लीबियातील सिरते शहरातून या सर्व नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. हे सर्व कामगार होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह एल सिसी यांनी सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी दहशतवादाविरोधात आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. इजिप्तच्या नागरिकांना लीबियामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लीबियामध्ये सुमारे चार वर्षांपूर्वी मुअम्मर गडाफी या हुकूमशहास नाटो फौजांनी ठार केल्यानंतर देशामध्ये अशांतता व हिंसाचाराचे सावट पसरले असून, देशाच्या पश्‍चिम व पूर्व भागामध्ये विविध दहशतवादी संघटना उदयास आल्या आहेत. लीबियामध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न साफ अपयशी ठरले आहेत. लोकनियुक्त सरकारला त्रिपोलीमधून सत्तासूत्रे हाती घेता आलेली नसून; सध्या टोब्रुक या पूर्व लीबियामधील शहरामधून संसदेचे काम सुरु आहे

Share