गुडडापूरात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचा मेळावा उत्साहात

0
12

जत(जि.सांगली),दि.09ः-जुनी पेन्शनची मागणी रास्त असून हा प्रश्न विधानसभेत मांडू आणि पेंशन मिळावी यासाठी आपली आग्रही भूमिका राहणार आहे.आपल्या न्याय हक्कासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन आमदर विलासराव जगताप यांनी केले.ते गुड्डापूर येथे आयोजित महाराष्ट्र जुनी पेंशन निर्धार हक्क मेळाव्याचे उदघाटक म्हणून बोलत होते.

४ एप्रिल रोजी गुड्डापूर/जत येथे नवीन अंशदान पेंशन धारकांचा भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.याकरीता जत ते गुडडापूर पेन्शन रॅली काढण्यात आली. मेळाव्यास १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले शिक्षक,आरोग्य सेवक,ग्रामसेवक,वनविभागाचे कर्मचारी,तलाठी तसेच इतर सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्याचे उद्घाटन जत मतदारसंघाचे आमदार विलासराव जगताप यांनी केले.मेळाव्यास शिक्षणसभापती तम्मनगौडा राविपाटील,ज्येष्ठ नेते आर.के.पाटील,जि. प.सदस्य विक्रमदादा सावंत,सरदार पाटील,संघटनचे राज्य संपर्क प्रमुख प्राजक्त झावरे पाटील,राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे,सोलापूर जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे,सोशल मीडिया प्रमुख प्रकाश कोळी,राज्यसमन्वयक दिगंबर तोडकरी उपस्थित होते.मेळाव्याचे प्रास्तविक संघटनेचे तालुका अध्यक्ष शाम राठोड यांनी केले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे  यांनी १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि मृत्यू झालेल्या कर्मचार्यांना शासनाने कसलीच मदत केली नसल्याचे विचार व्यक्त केले.सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सर्व 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यानी वेगवेगळ्या संघटनामध्ये विभाजित न होता पेन्शन हक्क संघटनच्या व्यासपीठावर एकत्रित येत संघटनच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घेतल्यास ही योजना नक्की बदलेल असा विश्वास व्यक्त केला.प्रत्येक तालुक्यात संघटन प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहचवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.मंचावर उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष किशोर कांबळे,सांगली जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी,जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ,कन्नड विभाग प्रमुख गुरुबसू वाघोली,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पडलवार उपस्थित होते.संचालन नामदेव जाधव,गुणवंत विधाते,राहुल कोळी यांनी केले.आयोजनासाठी ज्ञानेश्वर पांपटवार, श्रावण कोरे,अशोक आंधळे,राजकुमार करडी,निरंजन नागरे,कांतप्पा संनोळी, तानाजी कांबळे,अशोक व्हनखंडे, साळे,आवताडे,दिलीप वाघमारे आणि सर्व नवीन अंशदान पेंशन धारकांनी सहकार्य केले.