गोंदियात अत्याचारविरोधात काँग्रेसचे उपोषण अांदोलन

0
11

गोंदिया,दि.09 – दलितांवर देशात होणारे अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत झाल्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस देशभरात एक दिवसाचा उपवास करत आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस एक दिवस त्यांच्या राज्य आणि जिल्हा मुख्यालयात उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दिल्लीतील आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले आहेत.तर गोंदिया येथील गांधी प्रतिमा चौकात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

2 एप्रिल रोजी अनुसुचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्यात झालेल्या बदलाविरोधात देशभर बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान आणि त्यानंतर दलितांविरोधात सुरु असलेल्या हिंसाचाराचा दलितांमध्ये मोठा रोष आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने मोदी सरकार दलित विरोधी असल्याचा आरोप केला आहे.काँग्रेसच्या आवाहनावर गोंदियात आयोजित उपोषण आंदोलनात  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,गोंदियाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल,जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,माजी मंत्री भरतभाऊ बहेकार,सभापती रमेश अंबुले,लता दोनोडे,नगराध्यक्ष सीमा कटरे,महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे,उषा मेंढे,पी.जी.कटरे,राजेश नंदागवळी,डॉ.योगेंद्र भगत,सहेषराम कोरेटी,प्रकाश रहमतकर,विनोद जैन,डेमेंद्र रहागंडाले,रत्नदीप दहिवले,राकेश ठाकुर,संदिप ठाकुर,मोंटु पुरोहित,चिकू अग्रवाल,विकी बघेले,राहुल कटरे,झामसिह बघेले,भाष्कर रहागंडाले,अशोक लिचडे,चमणलाल बिसेन,माधुरी हरिणखेडे,अपुर्व अग्रवाल,देवा रुसे,भागवत मेश्राम यांच्यासह शेकडो काँग्रेसी या आंदोलनात सहभागी झाले होते.