बोगस औषधी नव्हे तर बॅच फेल प्रकरण-उत्पल शर्मा

0
18

गोंदिया,दि.09-येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या इंजेक्शन प्रकरणात अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेले प्रकरण बनावटी औषधीचे नसून सदर प्रकरण ‘बॅच फेल‘चे असल्याची माहिती गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाच्या वतीने केमिस्ट भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष उत्पल शर्मा यांनी दिली.पत्रपरिषदेला सचिव सुशिल शर्मा,संघटन सचिव सुसेनजित शाह,माजी अध्यक्ष संजय दुबे,माजी नागपुर झोन अध्यक्ष शशीभूषण नागपूरे,सहसचिव ललीत सोनछात्रा आदी उपस्थित होते.फेब्रुवारी २०१७ ते जुलै २०१७ या कालावधीत गोंदिया येथील साईधाम मेडिकल येथून बाई गंगाबाई महिला रूग्णालयात औषधी पुरविण्यात आली होती.तिचा उपयोग ही करण्यात आला.दरम्यान मार्च महिन्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक मनीष गोतमारे यांनी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बनावट औषधी विकली जात असल्याची गोंदिया शहर पोलीसात तक्रार दाखल केली.या प्रकरणी मध्यदेशातील इंदोर यथील बायोग्राफीचे संचालक मितू अग्रवाल,नागपूर येथील सम्राट फार्मासिटीकल नीलेश कीर्तीकुमार संचेती,श्री लार्माचे नीलेश घोरसे,साईधाम मेडीकलचे रामqसह भारद्वाज व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाचे फार्मासिस्ट मोहम्मद अब्दुल अजीज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.उत्पल शर्मा यांनी सांगितले की,कुठलाही औषधी विके्रता औषधी तयार करित नाही. कंपनीने पुरविलेले औषधीचेच पुरवठा करतो. सदर प्रकरणी जे औषध पुरविण्यात आले ते मुख्य वितरक-थोक विक्रेता-किरकोळ विक्रेता यांच्यामार्फत पुरविण्यात आले. औषधी निर्माण कंपनी औषध तयार करते तेव्हा त्या औषधीत कुठले द्रव्य व प्रमाण असते ते तपासण्यासाठी औषधी व अन्न प्रशासन विभागाला पाठविते.तपासणीनंतर बॅच क्रमांक दिला जातो व त्यानंतर औषध तयार केली जाते. कंपनीने बॅच क्रमांक प्रमाणे त्या औषधीत कुठले तत्व आहेत यांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभाग नियमितरित्या तपासणी करून पाहते व अनेकदा काही कारणामुळे ते प्रमाण मिळत नाही याचा अर्थ ते औषध बनावटी आहे असे नाही. यप्रकरणी ही निरीक्षक वाघमारे यांनी सखोल तपासणी न करता घाईगर्दीने औषध बनावटी असल्याची तक्रार दाखल केली व त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात औषधी संदर्भात कठोर कायदे असल्याने तसेच संबंधित विभागामार्फत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याने राज्यात तसेच गोंदियात बनावटी औषधी नाहीत सदर प्रकरण बॅच फेलचे असल्याने ग्राहकांनी घाबरून जाऊ नये सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणी योग्य तपास होऊन सत्य समोरच येईल असेही त्यांनी सांगितले.