नगर भुमापनामुळे मालमत्ताधारकांवर कर संदर्भात अन्याय नाही-जिल्हाधिकारी शेखर सिंग

0
14

देसाईगंज,दि.९(अशोक दुर्गम)ः- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिला नगर परिषद म्हणुन ओळखल्या जाणाय्रा देसाईगंज शहराचा सिटी सर्वे (नगर भुमापन) मुळे जेवढी मालमत्ता आहे तेवढ्याच मालमत्तेवर नियमानुसार तांत्रीक दृष्ट्या आकारणी केल्या जाते. यामुळे कुणाला कमी व कुणालाही जास्त असा भेदभाव केल्या जात नाही. शिवाय यामुळे वहिवाटधारकाला मालमत्तेची अधिकृत आखिव पत्रिका मिळत असते. याचाच अर्थ, नगर भुमापनामुळे मालमत्ता धारकांवर कर संदर्भात अन्याय होत नाही, असे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी प्रतिपादन केले .

देसाईगंज नगर परिषद तर्फे देसाईगंज शहराचा सिटी सर्वे शुभारंभ,ग्रीन जीम चे शुभारंभ,देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील २७९ दिव्यांगाना नगर परिषद ३℅राखिव निधीतुन धनादेश वितरण कार्यक्रम देसाईगंज नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणातील आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणुन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे ,नगराध्यक्ष शालुताई दंडवते, नगरपरीषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा , गडचिरोली चेअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयाचे गजानन दाबेराव, देसाईगंज चे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम , देसाईगंज तहसिल चे तहसिलदार टी जी सोनवाने, नगर परिषद देसाईगंज चे मुख्याधिकारी तैमुर मुलानी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंग पुढे म्हणाले की, देसाईगंज शहराचा सिटी सर्वे खरे पुर्विच व्हायला पाहिजे होते.मात्र काही हरकत नाही, तत्कालिन जिल्हाधिकारी ए एस आर नायक यांनी देसाईगंज शहराचा सिटी सर्वे बाबत योजना मंजुरच करुन ठेवली होती.त्यामुळे याचे श्रेय देखिल त्यांना दिले पाहिजे. भुमिअभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधिक्षक गजानन दाबेराव यांनी लवकरात लवकर सिटी सर्वे पुर्ण करुन शहरातील नागरिकांना प्रापर्टी कार्ड वितरण करुन नगर परिषद देसाईगंजने देखिल मालमत्तेनसार फेर मुल्यांकन करुन नियमानुसार तांत्रीक दृष्ट्या आकारणी करुन उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढवावे. सिटी सर्वे मळे कुणालाही जास्त अथवा कुणालाही कमी असा भेदभाव होणार नसुन अशा मालमत्ता कर आकारणीवर चाप बसणार आहे, असे ही ते म्हणाले .

यावेळी आमदार कृष्णा गजबे नगराध्यक्ष शालुताई दंडवते यांनाही समयोचित आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरीषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांनी तर आभार नगरपरीषद मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांनी मानले.कार्यक्रमाला नगरपरीषद चे सर्व सभापती नगरसेवक कर्मचारी विभाग प्रमुख उप अधिक्षक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी महसुल कर्मचारी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.