पोलिसांच्या समस्या मार्गी लावणार : पप्पू साहेब आंधळकर

0
28
सोलापूर दि.१०ः-: प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलातून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना भासणाऱया समस्या या कायम राहतात. त्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, मात्र याच समस्यांची दखल घेण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाची बैठक रविवारी 22  एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्य़ात अकलूज येथे होणार असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार संघाला सात महीने पूर्ण झाले असून या संघाची शासनाकडे नोंदणीही करण्यात आली आहे. येत्या रविवारी 22 एप्रिल रोजी विविध समस्या मार्गी लावण्यात येणार आहेत पोलिसांना महसुल खात्याप्रमाणे वेतन श्रेणी,राहण्यासाठी सुसज्ज घरे
,ड्युटी चे तास कमी करणे आद्यावत शृस्र,आद्यावत  वाहने,तात्काळ लोन ची व्यवस्था ,पोलिस म्यँनुवल मधे बदल ,अधिकारी वर्गाचे जाचातुन स्वतंत्र विचारांना वाव ,बढती बाबतीतील प्रश्न  ,रहायला बँचलर बँरेक ची व्यवस्था,डी जी लोन ची महीणेवारी यादी काढणे ,हरँश मेंट कमी करणे, आतिरीक्त संख्याबळ वाढविणे,8 तासाच्यावर होणार्या  नोकरी चा ओव्हर  टाईम  च्या  बाबतीत  विचार  करावा.
त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक पोलीस मित्र परिवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष पप्पू साहेब आंधळकर व जिल्हा उपाध्यक्ष तात्या राखले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश सुरवसे पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, सचिव आकाश बोराडे, अॅड.शेख, डॉ.योगेश गायकवाड, व महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ातील अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ही बैठक सकाळी 11 वाजता अकलूज येथे आयोजित करण्यात आली आहे.