बोगुठागुडम येथे माजी आमदार आत्रामांनी घेताल आठ गावांचा आढावा

0
11

सिरोंचा,(अशोक दुर्गम)दि.10ः-.तालुक्यातील रेगुंठा परिसरातील आठ गावातील आविस कार्यकर्त्यांची बैठक बोगुठागुडम येथे  आविसं नेते माजी आमदार दीपकआत्राम व जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
आविस कार्यकर्त्यांच्या या बैठकीचे अध्यक्ष आविसचे विदर्भ नेतृत्व अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आविसचे युवा नेतृत्व अजय कंकडलवार, आविसचे जेष्ठ नेते मंदा शंकर, सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव,सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, सरपंच कमला आलाम, उपसरपंच वेंकटेश तोडसम, माजी पंचायत समिती सदस्य तोडसाम चंद्रु, सिरकोंडा ग्रा.पं. उपसरपंच लक्ष्मण गावडे, माडेम समय्या,संतोष जाकावार, मारोती गणपुरापु, रवी बोन्गोनी, तिरुपती वैशाखा, राजान्ना अग्गूवार, बबलू शेख, स्वामी जाकावार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान माजी आमदार दीपक आत्राम आणि जि. प.उपाध्यक्ष कांकडालवार यांनी आविस कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची अडीअडचणी जाणून घेतले आणि आविस कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.आविस कार्यकर्त्यांच्या या बैठकीला रेगुंठा परिसरातील मुलदीम्मा, येला, कोटापल्ली, बोड्रा, दर्शेवाडा, नरसिहपल्ली, परसेवाडा आणि बोगुठागुडम येथील कार्यकर्ते उपस्थित होते.बोगुठागुडम येथील आविस कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश पोन्नावार, स्वामी जाकावार, उपसरपंच संतोष जाकावार, रामुलु शेट्टींवार, वेंकन्ना जाकावार,समय्या दुर्गे, स्वामी पट्टेम, पुन्नम पट्टेम, रमेश तोटावार, शेखर पट्टेम,कोला सत्यम, राजान्ना कुमरम,शंकर बटला, शंकर गावडे, राजेश्याम तोगारी, किष्टु आत्राम, तुळशीराम अट्टे, चंदू आकुला, समय्या बेज्जनी, कोला बापू, राजेश तोगारी, स्वामी पेंदाम, श्रीनिवास पोरटेट, मदनय्या कोडापे, तिरुपती कोडापे, दिलीप आलाम, शंकर मडावी, सत्यम गावडे, लिंगय्या आलाम, सत्यम पोरटेट, आनंद आत्राम, सत्यम गौररापू, रवी कोडापे, कोंडय्या पोरटेट, रवींद्र आत्राम, वसंत कोडापे, चंद्रशेखर कोडापे, मधुकर कोरते, रामय्या कोडापे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.