भिलेवाड्याजवळ मृतावस्थेत आढळला बिबट

0
33

भंडारा,दि.११ः~ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील भंडारा लाखनी दरम्यान येत असलेल्या भिलेवाडा गावासमोर असलेल्या प्लास्टिक कारखानाच्या समोरील  भिलेवड़ा-सिंगोरी शेतशिवात मृतावस्थेत बिबट आढळल्याची घटना उघडकीस आली.राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या १०० मीटर अतंरावर शेतातील बांधीमधील आहे.शेजारून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने बहुतेक वाहनाच्या धडकेत जखमी होऊन मृत झाला असावा किंवा विजेच्या तारेमुळे मृत होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळणार आहे.या घटनेने मात्र पुन्हा प्राणी गावाकडे येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या चमून घटनास्थळी पोहचून बिबट्याची पाहणी केली असता कुठल्याही जखमा शरीरावर नसल्याचे सांगण्यात येत आहे.