भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक याचिका खारीज

0
8

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा मार्ग मोकळा

 नागपूर,दि.11 : लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज नागपूर खंडपीठाने फेटाळल्याने या पोटनिवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
.गेल्या 7 डिसेंबरला भाजपचे नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला केवळ एक वर्ष शिल्लक राहिलेले असताना, या पोटनिवडणुकीवर विनाकारण खर्च करू नये. तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळावा. या निवडणुकीवर आणखी 6 ते 8 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी असल्याने हा खर्च करू नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती.
उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. ही याचिका प्रमोद प्रमोद गुडधे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. सदर याचिका आज मा. उच्च न्यायालयाने फेटाळली आहे