मुख्य बातम्या:

तूर खरेदीची तारीख वाढवा अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल

बिलोली(सय्यद रियाज)दि.११ : देगलूर तालुक्यातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २५% शेतकऱ्यांची तूर अजूनही खरेदी झाली नाही.त्यातच शासनाने १८ एप्रिल ही खरेदीची शेवटची तारीख घोषीत केली आहे. जर आता काटा बंद झाला तर अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होईल. म्हणून शासनाने तात्काळ लक्ष घालून तारीख वाढवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदन कैलास येसगे कावळगावकर, योगेश पाटील, शशांक पाटील मुजळगेकर यांनी विश्व परिवारच्या माध्यमातून देगलूर तहसीलदार  महादेव किरवले व मार्केट कमिटीचे सचिव सतीष मेरगेवार  यांना दिले.देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा येथे चालू असलेल्या काट्यावर हमालांकडून शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. शेतकऱ्यांना न कळवता काटा अचानक बंद केला जात आहे. या सर्व अनियमितता तात्काळ थांबवून काटा सुरळीत चालवा असे या निवेदनात नमूद केले आहे.यावेळी विश्व परिवारचे  सुभाष कदम, जावेद अहमद, हबीब रहेमान, संचालक इरवंतराव तोनसुरे, ठाकूर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Share