मुख्य बातम्या:

अपंगाच्या मागण्यासाठी सोयगाव तहसील समोर प्रहारचे आंदोलन

सोयगाव दि.12ः- तहसिल कार्यालया समोर अपंगाच्या विविध मागण्यांसाठी आमदार ओमप्रकाश (बच्चु) कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहार स्टाईलमध्ये जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे,तालुकाध्यक्ष  संदीप (बापु) इंगळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन दि. ११ एप्रिल रोजी करण्यात आले.आंदोलनात अंपगाना २१ हजाराचे प्रमाणपत्ञरविना अट देण्यात यावे, अंपगाना रॅम्पची व्यवस्था करणे, अंपगाना अंत्योदय रॅशेन कार्ड देण्यात यावे, तहसील कार्यालयासमोर मुद्रांक विक्रेता नेमण्यात यावा, अंपगाना लागणारे प्रमाणपत्र गाव पातळीवर देण्यात यावे अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसिलदार छायाताई पवार यांनी मागण्या मान्य करीत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. तर यावेळी संजय चव्हाण  (जनशक्ती पक्ष जि. प्रमुख) अनिल भाऊ पालोदे  (शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष) शेख मुसा भाई (गंगापूर पक्ष ता. प्रमुख) संतोष भाऊ पाटील  (शे. स. पाचोरा ता. अध्यक्ष) संजय भाऊ मिसाळ (जि. सहसचिव), ऐकनाथ गौंड  (शे. स. सोयगाव ता. अध्यक्ष) राजधर पाटील, विनोद पगारे, दिपक फुसे, ऐकनाथ गाडेकर, अनिल लोखंडे, प्रमोद बावस्कर, मंगलाताई जोहरे, मंगलाबाई चौधरी, यांच्या सह तालुक्यातील शेकडो अंपग आदोलंनामध्ये सहभागी झाले होते.
Share